भीमा कोरेगाव जयस्तंभस मानवंदनेसाठी उसळला रेकॉर्ड ब्रेक लाखोचा जनसागर

भीमा कोरेगाव जयस्तंभस मानवंदनेसाठी उसळला रेकॉर्ड ब्रेक लाखोचा जनसागर
समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना व अभिवादन नेतृत्व-भीमराव आंबेडकर
बीड/वार्ताहर
पुणे शहरापासून तीस किलोमीटर दूर असलेल्या भीमा नदीच्या काठावरती अठराशे अठरा या दिवशी पेशव्यांचा लढाईत पराभव करून 500 शूरवीरांनी विजय प्राप्त केला, याची आठवण व साक्ष ठेवण्यासाठी भीमा नदीच्या काठावरती हा विजयस्तंभ उभारण्यात आला आहे, त्यावर लढाईत लढलेल्या त्या महान शूरवीरांची नावे कोरली गेली आहेत, ही लढाई जाती व्यवस्थेविरुद्ध होती, हक्क अधिकार मिळवण्याची होती, सत्तेसाठी मिळवण्यासाठी नव्हती, आम्ही प्रमाण आहोत आम्हाला देखील हक्क अधिकार द्या माणसाप्रमाणे वागतो यासाठी हे युद्ध झाले होते, त्यामध्ये विजय हा बहुजन समाजातील 500 शूरवीरांनी मिळवला, ह्या गोष्टीचा इतिहास डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी गेले त्यावेळेस त्यांना इंग्रज अधिकारी लिहून ठेवलेल्या पुस्तकातून माहिती मिळाली.
समता सैनिक दलाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील समता सैनिक दलाने या विजयस्तंभ मानवंदना दिली त्यामध्ये महिला समता सैनिक पुरुष समता सैनिक सहभागी झाले होते,कदम ताल व सैनिकी बँड च्या तालावर ती परेड करत हे सर्व सैनिकांनी मानवंदना दिली व अभिवादन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भीमा नदीच्या काठावरती उभा असलेल्या कोरेगाव येथील विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी प्रत्येक वर्षी जात असत, हा आमच्या पूर्वजांचा खरा इतिहास सर्व जगाला व महाराष्ट्रातील, देशातील जनतेला लक्षात यावा म्हणून प्रत्येक वर्षी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी जात असेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची तीच परंपरा बहुजन समाजातील हजारो लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात.
दोन वर्षाचा पूर्ण काळ संपल्यानंतर यावर्षी म्हणजे 1 जानेवारी 2023 रोजी लाखोच्या संख्येने भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी आंबेडकर आणि आई व बहुजन आले होते, आजवरचे सर्व रेकॉर्ड 1जानेवारी 2023 रोजी मोडले गेले आहेत, वीस लाखाच्या वर आंबेडकरवादी अनुयायी या विजयस्तंभस अभिवादन व मानवंदना करण्यासाठी आले होते, याचा मी त्याचा मी ही एक साक्षीदार आहे.
भीमा कोरेगाव च्या जवळच वढू बुद्रुक हे देखील महत्त्वाचे स्थळ आहे. ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी राजे यांची समाधी स्थळ आहे, त्या ठिकाणी देखील आंबेडकरवादी व बहुजन समाजातील अनेक बांधव अभिवादन करण्यासाठी आले होते, छत्रपती संभाजी राज्यांना छळकपट करून हाल हाल करून मारले व त्यांच्या शरीराचे तुकडे भीम नंदी काठी फेकुन देऊन पेशव्यांनी फरमान सोडले जो कोणी अंत्यविधी करील त्याला व त्याच्या कुटुंबाला असेच हाल हाल करून मारली जाईल, पण महाराष्ट्राचा राजपुत्र छत्रपती संभाजी राजांच्या शरीराचे तुकडे फरमान मोडुन एका वढु बुद्रुक येथील शूरवीराने गोळा करून सन्मान पूर्वक अंत्यविधी केला, त्या देखील शूरवीराची समाधी वढु येथे आहे, त्यांना देखील अभिवादन करण्यासाठी भीमा कोरेगावला येणारे लाखो लोक येऊन अभिवादन करतात, हा परिसर जनसागराने खच भरून गेला होता. आज पर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले गेले आहेत इतकी जनसागर अभिवादन करण्यासाठी भीमा कोरेगाव,वढू बुद्रुक येथे आली होती, यामध्ये सर्वच राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मंत्री माजी मंत्री स्त्री पुरुष आबाल वृद्ध, हे सर्व स्वखर्चाने, स्वतःच्या वाहनाने, कुणीही न बोलता आलेले, फक्त आणि फक्त आपल्या पूर्वजांच्या शौर्याला अभिनंदन करण्यासाठी आले होते .








