इन्स्पायर कोचिंग क्लासेस यांच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार व चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा संपन्न

इन्स्पायर कोचिंग क्लासेस यांच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार व चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा संपन्न
बीड/वार्ताहर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बीड येथे आज पार पडलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार व चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये माजी आमदार सय्यद जी सलीम, एम.आय.एम चे जिल्हा अध्यक्ष शेख शफिक़ भाऊ, सर सय्यद शाळेचे सचिव अब्दुल वकील सर, मिल्लत शाळेचे सचिव उमेर सलीम सर, जय हिंद कॅम्पस चे सचिव निजाम शेठ, तुलसी इंग्लिश स्कूलचे सचिव रोडे सर, प्रोफेशनल इन्स्टिट्यूट चे डायरेक्टर पवार सर, फॉरेस्ट ऑफिसर ससाने मॅडम, सहशिक्षिका सलमा बाजी, इमरान इनामदार, मुझफ्फर इनामदार, इन्स्पायर कोचिंग चे डायरेक्टर अरफात सर उपस्थित होते.
या कार्यक्रमात चित्रकलेचे बक्षीस मध्ये दोन ग्रुप साठी प्रथम, द्वितीय, तृतीय, सायकल स्टडी चेअर व ड्रॉइंग किट होते. व सर्व आदर्श शिक्षकांना सर्टिफिकेट व ट्रॉफी देण्यात आली. यावेळेस कोचिंग चे डायरेक्टर यांनी सांगितले की शिक्षण हे काळाची गरज आहे, सर्वांनी शिक्षण घेतले पाहिजे. कॉम्पिटिशनचा रिझल्ट मुकरम सर आणि अमर सर यांनी काढले








