काझी सेवा संघाची बैठक संपन्न तर बैठकीत सत्कारमूर्तीचे केले सत्कार

काझी सेवा संघाची बैठक संपन्न तर बैठकीत सत्कारमूर्तीचे केले सत्कार
बीड/वार्ताहर
फक्त काझी समाजाच्याच नव्हे तर मुस्लिम समाजातील सर्व उपेक्षित घटकाच्या उन्नतीसाठी एकजुटीने काम करण्याचा ठाम निर्धार संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष काझी मुहम्मद शफीक यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य निरीक्षक काझी अब्दुल जब्बार यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या काझी समाज सेवा संघाच्या महत्वपूर्ण व भरगच्च बैठकीत करण्यात आला. बीड येथील प्रसिद्ध गोल्डन चॉईस हॉटेलमध्ये काझी समाजसेवा संघाचा राज्यस्तरीय मेळावा काझी मुजाहिद सिद्धीकी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संघटनेचे राज्य अध्यक्ष काझी अकबर अली व महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे युवा सदस्य काझी समीर यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वीपणे पार पडल्यानंतर रविवार, दिनांक १ जानेवारी २०२३ रोजी काझी समाज सेवा संघाचे राज्य कार्याध्यक्ष काझी मुहम्मद शफीक यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य निरीक्षक काझी अब्दुल जब्बार यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड येथील शहेनशाहनगर भागातील अल्कबीर बिनव्याजी बँकेत संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उर्दू दैनिक तामीरचे संपादक काझी मकदूम यांनी केले. या बैठकीत मराठी दैनिक दिव्य लोकप्रभाचे उपसंपादक काझी अमान, काझी शफीक (धोंडराई), शफीक फारुकी (बीड), काझी अबूबक्र (परळी), काजी जुबेर (बीड) आदींनी आपले विचार व्यक्त केले. तर सहशिक्षक काझी मुशाहिद यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. याप्रसंगी बीडचे ज्येष्ठ पत्रकार काझी मकदूम यांचे चिरंजीव काझी फहाद यांची जिल्हा माहिती अधिकारी म्हणून भंडारा जिल्ह्यात नियुक्ती झाल्याबद्दल, मुख्याध्यापक काझी अब्दुल माजेद यांना उपशिक्षणाधिकारी म्हणून पदोन्नती मिळाल्याबद्दल, बीड प्रसारचे संपादक काझी समीर यांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाल्याबद्दल तर फारुकी पेट्रोल पंपाचे रफिक फारुकी यांची भारत पेट्रोलियम सल्लागार मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सर्व सत्कारमूर्तीनी सत्काराला उत्तर दिले. यावेळी काजी समाजसेवा संघाचे राज्य निरीक्षक काझी अब्दुल जब्बार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तर राज्य कार्याध्यक्ष काझी मुहम्मद शफीक यांनी अध्यक्षीय समारोप केला. या बैठकीत फक्त काझी समाजच नव्हे तर मुस्लिम समाजातील उपेक्षित घटकाच्या उन्नतीसाठी 'बैतुल माल' सुरू करण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येऊन संघटनेची जिल्हा व तालुका कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली. हाफेज काझी तोहीद यांच्या तिलावते कुरआन व काझी अय्युब यांच्या नातिया कलामने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या बैठकीस बीड जिल्ह्यातील जवळपास सर्व तालुक्यातील काझी बांधव आवर्जून उपस्थित होते. गेवराईचे जेष्ठ पत्रकार काझी अमान यांच्या 'दुआने' कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.








