वडवणी पंचायत समिती कार्यालयात तालुक्यातील नूतन सरपंचाच्या सत्कार  

Beed

वडवणी पंचायत समिती कार्यालयात तालुक्यातील नूतन सरपंचाच्या सत्कार  

वडवणी/प्रतिनिधी

तालुक्याच्या ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या वडवणी पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी नागरगोजे यांच्या अभिनव अशा संकल्पनेतून 25 नवनिर्वाचित सरपंच यांचा सत्कार व जुण्यांना निरोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमास कार्यक्षम गट शिक्षण अधिकारी बाबासाहेब उजगरे,डॉ. निपटे,बालविकास अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.आगामी काळात मूलभूत व भौतिक विकास कसा असावा या संदर्भात गट विकास अधिकारी विठ्ठ ल नागरगोजे यांनी सविस्तर विवेचन केले.तालुक्यात सर्व सरपंच आणि ज्यांचा कार्यकाळ संपला अशा सर्व माजी सरपंच पदाधिकारी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तालुका स्तरीय सर्व अधिकार उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter