आरटीईचे वेळापत्रक कधी जाहीर होणार?

Beed

आरटीईचे वेळापत्रक कधी जाहीर होणार?

लवकरात लवकर वेळापत्रक जाहीर करा ; मनोज जाधव यांची शिक्षण संचालकांकडे मागणी

बीड/प्रतिनिधी

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळांमध्ये राखीव असणार्‍या २५ टक्के जागांसाठीच्या प्रवेशप्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक गत वर्षी डिसेंबर अखेर जाहीर झाले होते. यंदा या वेळापत्रकाबाबत शिक्षण विभागाकडून कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे वेळापत्रक नेमके कधी जाहीर होणार, असा प्रश्न पालक उपस्थित करत आहेत.

 

                शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत यावर्षी शाळांच्या नोंदणीची प्रक्रिया अजूनही सुरू झालेली नाही. सामान्यतः डिसेंबरमध्ये शाळांच्या नोंदणीसाठीची प्रक्रिया सुरू केली जाते, यावर्षी जानेवारी उजाडला तरी प्रतीक्षाच आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेत पहिल्यांदा ऑटो फॉरवर्डफ केलेल्या शाळांची आणि नवीन नोंदणी झालेल्या शाळांची पडताळणी करण्यात येते. ही प्रक्रिया वेळखाऊ असते. त्यामुळे वेळापत्रक जाहीर करून ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असते. मात्र, यंदा वेळापत्रकच जाहीर झाले नसल्यामुळे ही प्रक्रिया नेमकी कधी सुरू होणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या वेळापत्रकाच्या घोळा मुळे गत वर्षी राज्यभरात ३९ हजार प्रवेश होऊ शकले नाहीत तर जिल्ह्यात ५७५ प्रवेशाच्या जागा रिक्त राहिल्या आहेत . याला जब्बदार कोण? असा सवाल विचारत ही प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी शिक्षण संचालक यांच्या कडे निवेदना द्वारे केली आहे.

Sharing

Visitor Counter