रिटेल किराणा व्यापार्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा

रिटेल किराणा व्यापार्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा
व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष अशोक शेटे यांची ग्वाही
बीड/प्रतिनिधी
रिटेल किराणा व्यापार्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी बीड जिल्हा व्यापारी महासंघ तत्पर आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे प्रतिपादन बीड जल्हा व्यापारी महासंघाचे नुतन कार्याध्यक्ष अशोक शेटे, अध्यक्ष भास्करराव जाधव यांनी केले.
बीड जिल्हा व्यापारी महासंघाच्या कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली. या नुतन कार्यकारिणीतील पदाधिकार्यांचा बीड शहर रिटेल किराणा व्यापारी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यानिमित्त आयोजीत कार्यक्रमात अशोक शेटे, भास्करराव जाधव यांनी संवाद साधला. सत्कार समारंभात व्यापार्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी बीड शहर रिटेल किराणा संघटनेचे अध्यक्ष विनोद ललवाणी, उपाध्यक्ष राजूसेठ तापडिया, सचिव अनिल गुप्ता, कोषाध्यक्ष महेश शेटे तसेच किरण बोरा, प्रशांत मुंदडा, धनेश दोडिया, जिंदास दोडीया, विजय लाहोटी, ज्ञानदेव डाके, कांतासेठ तापडिया आदी पदाधिकारी उपस्थित होते.








