गेवराई व बीड जिल्ह्यातील समाज बांधव हे छत्रपतींवर जीवापाड प्रेम करतात हे पुन्हा एकदा सिद्ध

गेवराई व बीड जिल्ह्यातील समाज बांधव हे छत्रपतींवर जीवापाड प्रेम करतात
हे पुन्हा एकदा सिद्ध
गेवराई मध्ये स्वराज्य संघटनेची तालुकास्तरीय बैठक संपन्न
गेवराई/प्रतिनिधी
छत्रपती संभाजीराजे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेच्या तालुकास्तरीय बैठकीचे आयोजन मंगळवार दि. 10 जानेवारी रोजी गेवराई येथीली बेदरे लॉन्स येथे करण्यात आले होते. या बैठकीला प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते व संपर्क प्रमुख करण गायकर, प्रदेश उपाध्यक्ष आप्पासाहेब कुढेकर, निमंत्रक गंगाधर नाना काळकुटे, विजय वाहुळे, प्रा. निलेश वीर, ड विलास पवार, गणेश नलवडे, विठ्ठल बाराते, भारत पिंगळे, वैभव दळवी स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन मुकुंद राजखेत्रे यांनी केले तर प्रास्ताविक नाना पवार यांनी केले.
यावेळी स्वराज्य संघटनेचे निमंत्रक गंगाधर नाना काळकुटे यांनी सांगितले की, ’बीड जिल्हा हा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रेम छत्रपती संभाजीराजांवर करतो. जिथे जिथे शाखा उद्घाटन झाल्या, त्या शाखांपेक्षा मोठ्या जल्लोषात बीड जिल्ह्यातील शाखा उद्घाटन सोहळा संपन्न होईल.’
या वेळी बोलताना स्वराज्य उपाध्यक्ष आप्पासाहेब कुढेकर यांनी सांगितले की, ’लवकर गेवराई तालुक्यातील विविध गावामध्ये स्वराज्य संकल्प अभियानांतर्गत गाव तिथे शाखा घर तिथे स्वराज्य हे अभियान राबविण्यात येणार असून लवकरच स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थिती शाखेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तरी गेवराई तालुक्यातील कार्यकत्यांनी आता जोमाने कामाला लागावे.’
महाराष्ट्र राज्याचे स्वराज्य संपर्कप्रमुख करण गायकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ’आज पर्यंत सर्व राजकीय पक्षांनी गेवराई तालुक्यातील तरुणांचा फक्त राजकारणासाठी वापर केला, परंतु आता छत्रपती संभाजीराजेंसारखं निष्कलंक नेतृत्व ज्यावेळेस आपल्याला मिळतंय त्या नेतृत्वाचा पुरेपूर फायदा घेऊन आपण आपल्या भविष्यातील राजकीय वेध घेऊन आपल्या जीवनात बदल करणे गरजेचे आहे. येणारा काळ हा आपला अवघड आहे, कारण छत्रपती संभाजीराजे यांची स्वराज्य संघटना नक्कीच राजकारणामध्ये अजून आधी जरी नसेल परंतु संघटनेची वाटचाल बघता भविष्यातला या सगळ्या राजकीय पक्षांचा पर्याय म्हणून राजकीय भूमिका नक्कीच निभवू शकतो.’
या बैठकीचे आभार प्रदर्शन राहुल चाळक यांनी केले. या बैठकीला गेवराई तालुक्यातील नागरिक नाना पवार, सचिन मोटे, राहुल चाळक, मुकेश मोटे, जयराम काळे, शिवाजी पवार, कल्याण मोटे, शाकेर सय्यद, अविनाश मोटे, भाऊसाहेब चव्हाण, अभिषेक जामकर, रामनाथ चव्हाण, महादेव चाळक, विकास चाळक, साईनाथ वखरे, शाम मोटे, बाळासाहेब घाडगे, सुरेश मोटे, त्रिंबक मोटे, किशोर नाटकर, महेश पवार, रोशन हत्ते, सुभाष उडान, विवेक कापरे, आदित्य चाळक, संपत मोटे, भीमराव सुतार, रविराज देशमुख, वैभव कदम, बाळू मोटे, आप्पासाहेब मोटे, शंकर पवार आदी उपस्थित होते.








