आध्यात्मिक सामाजिक कार्यकर्त्या ह.भ.प. प्रतिभा राधाकृष्ण गायकवाड यांना राज्यस्तरीय जिजाऊ रत्न पुरस्काराने सन्मानित

आध्यात्मिक सामाजिक कार्यकर्त्या ह.भ.प. प्रतिभा राधाकृष्ण गायकवाड यांना राज्यस्तरीय जिजाऊ रत्न पुरस्काराने सन्मानित
बीड/प्रतिनिधी
अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतिने राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवा निमित्ताने सामाजिक आध्यात्मिक कार्यकर्त्या ह.भ.प.प्रतीभाताई गायकवाड यांना राज्यस्तरीय जिजाऊ रत्न पुरस्कार जाहिर झाला आहे.ह.भ.प.प्रतीभाताई गायकवाड यांचे सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.
अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने दरवर्षी राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवा निमित्ताने आध्यात्मिक, सामाजिक,राजकीय,शैक्षणिक अदी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला व्यक्तींचा राज्यस्तरीय जिजाऊ रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते यावर्षी ह.भ.प.शिवचरिञकार ह.भ.प प्रतीभाताई गायकवाड आध्यात्मिक सामाजिक म्हणून राज्यस्तरीय जिजाऊ रत्न पुरस्कार जाहिर झाल्याची घोषणा अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राज्य उपाध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर कोकाटे महाराज यांनी पुरस्कार जाहीर केला आहे.या पुरस्कार सोहळ्याचे वितरण 12 जानेवारी 2023 रोजी मौजे संगम येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवा निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात होणार आहे सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.








