अलहुदा उर्दू हायस्कूल बीडची विद्यार्थिनी मायरा कुलसूम शेख मोईजोद्दीन हिला पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती मंजूर

अलहुदा उर्दू हायस्कूल बीडची विद्यार्थिनी मायरा कुलसूम शेख मोईजोद्दीन हिला पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती मंजूर
शिष्यवृत्तीच्या नव्या पॅटर्नमध्ये शिष्यवृत्ती मिळवणारी जिल्ह्यातील उर्दू माध्यमाची पहिली विद्यार्थिनी
बीड/प्रतिनीधी
शहरातील नूर एज्युकेशनल ऍण्ड वेलफेअर सोसायटी संचालित अलहुदा उर्दू हायस्कूल बीडची इयत्ता नववीची विद्यार्थिनी मायरा कुलसूम शेख मोईजोद्दीन हिला शासनाच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ता यादीतील स्थानासह शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. शिष्यवृत्तीसाठी आवश्यक असलेल्या गुणवत्ता यादीत 69.38 % गुणांसह विद्यार्थ्यानीने प्रतिष्ठित स्थान पटकावले आहे. हे उल्लेखनीय आहे की शहरातील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था अलहुदा उर्दू हाई स्कूल बीड मध्ये इतर शिष्यवृत्ती आणि विवीध स्पर्धा परीक्षांसोबत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाते आणि त्यांना योग्य मार्गदर्शन केले जाते, परिणामी अनेक विद्यार्थी दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरत आहेत. या वर्षी मायरा कुलसूम शेख मोईजोद्दीन ही विद्यार्थिनी वरील शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाली असून शिष्यवृत्ती मंजूर होईपर्यंत तिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. 2017 पूर्वी, इयत्ता 4 आणि 7 वी च्या विद्यार्थ्यांसाठी उक्त शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत होती, 2017 नंतर, नवीन पॅटर्ननुसार, ही परीक्षा इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जात आहे. या नव्या पॅटर्नमध्ये मायरा कुलसूम ही जिल्ह्यातील उर्दू माध्यमातील पहिली विद्यार्थिनी आहे.त्या दृष्टीने या विद्यार्थिनीचे हे यश अत्यंत महत्त्वाचे आहे.मायरा कुलसूमच्या या प्रशंसनीय कामगिरीबद्दल नूर एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष सय्यद शफीक अहमद हाश्मी, सचिव उबेदुल्ला खान, मुख्याध्यापक डॉ. सिराज खान आरजू, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन केले आहे.








