30 हून अधिक इच्छुक उमेदवारांचे प्रपोजल;लवकरच जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करणार–अजहर तांबोळी

30 हून अधिक इच्छुक उमेदवारांचे प्रपोजल;लवकरच जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करणार–अजहर तांबोळी
बीड प्रतिनिधी
एसडीपीआय (सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया) ची पत्रकार परिषद आज संध्याकाळी सहा वाजता गोल्डन चॉईस येथे पार पडली. या पत्रकार परिषदेला एसडीपीआयचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अजहर तांबोळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या पत्रकार परिषदेत अजहर तांबोळी यांनी सांगितले की, एसडीपीआय सध्या महाराष्ट्रातील २० जिल्ह्यांमध्ये सक्रियपणे कार्यरत आहे. "सध्या लोकशाही धोक्यात आहे. महाराष्ट्रात पक्षांचे दोन-दोन गट झाले असून, सरकार सध्या संकीर्ण विचारसरणीकडे झुकले आहे," असे ते म्हणाले.
तांबोळी पुढे म्हणाले, "एसडीपीआयने आतापर्यंत राज्यातील १७ जिल्ह्यांत चांगले कार्य उभे केले आहे. येत्या १० ते १५ दिवसांत बीड जिल्ह्याची कार्यकारिणीही जाहीर केली जाणार आहे. बीड जिल्ह्याची सध्याची ओळख खराब राजकारणामुळे आणि शेतकरी आत्महत्यानांमुळे झाली आहे, परंतु एसडीपीआय हे चित्र बदलण्यास कटिबद्ध आहे."
तांबोळी यांनी सांगितले की, "आमच्या २२ पेक्षा जास्त शाखा बीडमध्ये स्थापन झाल्या आहेत. आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी ३० पेक्षा जास्त उमेदवारांनी एसडीपीआयकडे अर्ज केले आहेत. आम्ही नव्या चेहऱ्यांना आणि तरुणांना संधी देणार आहोत."
या पत्रकार परिषदेत एसडीपीआयचे राज्य समिती सदस्य हाफिस सय्यद महोत्सिब, बीड जिल्हा संयोजक सय्यद अबे, माजलगावचे संयोजक मिर्झा सुजात, आणि सहसंयोजक सय्यद पैसल हेही उपस्थित होते.








