विजेचा शॉक लागून शिक्षक आप्पा यादव यांचा मृत्यू

विजेचा शॉक लागून शिक्षक आप्पा यादव यांचा मृत्यू
आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज.
तालुक्यातील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित इंदिरा माध्यमिक विद्यालय धामणगाव येथे सहशिक्षक पदावर कार्यरत असलेले आप्पा यादव सर यांना आज दि.13 जून रोजी शेतातील विहिरीवरील पाण्याची मोटार सुरु करताना विजेचा धक्का लागला आणि त्यात नुकताच परिसरात जोरदार पाऊस झाला असल्याने सर्वत्र ओलावा होता त्यामुळे विजेच्या जोरदार धक्क्याने यादव सर यांचे निधन झाले.
कडा कारखाना येथील जोशी वस्तीवरील जोशी समाजातील एकमेव शिक्षक म्हणून नोकरी करणारे अत्यंत मितभाषी कायम हसमुख असणारे तालुक्यात सर्वांशी एक मैत्रीचे नाते निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणून आप्पा यादव सर सुपरिचित होते ज्यांनी त्यांच्या जोशी समाजाचा पारंपरिक नंदी बैलाचा खेळ हा व्यवसाय न करता शिक्षण पूर्ण करून तरुण वयापासून राजकारणात सक्रिय झाले आणि सुरवातीपासून मा.आ.भीमराव धोंडे यांचा एक विश्वासू कार्यकर्ता म्हणून नावारूपाला आला मग जळगाव ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आणि त्यांची निष्ठा पाहून मा.आ.धोंडे साहेबांनी त्यांच्या संस्थेत शिक्षक या पदावर नोकरीला लावले ज्यामुळे जोशी समाजातील पहिले शिक्षक म्हणून आप्पा यादव सर हे समाजासाठी आदर्श झाले. यादव सर यांचा एकत्र कुटुंबाचा मोठा प्रपंच असून कुटुंबातील एकमेव कर्ता आणि नोकरीला असलेले आप्पा यादव सर यांचे असे दुर्दैवी निधन हे कुटुंबासाठी आणि सर्व समाज बांधवांसाठी एक मोठा धक्का आहे.








