कोरोना विरुद्ध युद्धात बुखारी उर्दू शाळेतील तिन महिन्या पासून अविरत लढा देत असलेले RSP अधिकारी सिद्दीखी सर व सहा शिक्षकांचे मोलाचे योगदान

Majalgaon

कोरोना विरुद्ध युद्धात बुखारी उर्दू शाळेतील तिन महिन्या पासून अविरत लढा देत असलेले RSP अधिकारी सिद्दीखी सर व सहा शिक्षकांचे मोलाचे योगदान

या शिक्षक योद्धाचा आम्हाला अभीमान आहे -इम्रान नाईक

माजलगाव/प्रतिनिधी

देश भरात गेल्या चार महिन्या पासून हाहाकार माजविलेल्या कोरोना आजारा मुळे जनतेचे बेहाल झाले तर प्रशासनाला जनतेच्या सुव्यवस्थे साठी न.पा. आरोग्य व सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचारी अपुरे पडल्या मुळे शासनाने शिक्षकांना चेक पोस्ट व पोलीस सोबत बंदोबस्ता करीता नियुक्त केले होते. त्यातच माजलगाव तालुक्यातील सर्वात मोठी नामांकित बुखारी उर्दू शिक्षण संस्थेतील सह शिक्षक शेख हमीद, शेख बासेत, देशमुख युसुफ, मुसा खान, शेख इरफान, मोहंम्मद पठाण, हे शिक्षक चेक पोस्ट व पोलीस बंदोबस्ता साठी रात्रदिवस कोरोना विरुद्ध युद्धात तैनात आहेत . व तसेच RSP अधिकारी असलेले शिक्षक सिद्दिकी वहाबोद्दिन मुनिसोद्दिन हे गेल्या तीन महिन्या पासून कोरोना विरुद्ध युद्धात पोलीस प्रशासना सोबत कार्य बजावत आहे. यांच्या कार्याचे समाजाच्या सर्व स्त्रातून व पोलीस प्रशासनाकडून कौतूक केले जात आहे. तसेच बुखारी उर्दू शिक्षण संस्थेचे सचिव अल्हाज खुर्शीद नाईक साहेब, सह सचिव इम्रान नाईक साहेब, प्राचार्य शेख हारून, मु.अ. शेख नवीद, व शाळेतील शिक्षक व कर्मचार्या कडून या सात योद्धाचे अभिनंदन करण्यात आले.

Sharing

Visitor Counter