मोदी सरकारच्या दुसऱ्या वर्षपूर्ती अभियानानिमीत्त भीमराव धोंडे यांच्याकडून पंतप्रधान पत्र वाटप

मोदी सरकारच्या दुसऱ्या वर्षपूर्ती अभियानानिमीत्त भीमराव धोंडे यांच्याकडून पंतप्रधान पत्र वाटप
आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज
आष्टी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त अभियानाचे आष्टी शहरातील व्यापारी व नागरिकांना पंतप्रधान पत्र वाटप करून अभियान माजी आ.भीमराव धोंडे,भारतीय जनता पार्टी आष्टी येथे संपन्न झाले.पंतप्रधान पत्र अभियान या पत्रात २०१९ मध्ये आपला आशीर्वाद देशातील जनतेचा आशीर्वाद हा देशाच्या स्वप्नांसाठी आशा आकांक्षांच्या पूर्ततेसाठी होतात त्यात भव्य स्वप्नांच्या भरतीसाठीची गेल्या एक वर्षातील निर्णयही गगनभरारी आहे.आज एक वर्षापूर्वी भारतीय लोकशाहीच्या इतिहासात एक सोनेरी अध्याय जोडला गेला देशामध्ये अनेक दशकानंतर जनतेने एखाद्या सरकारी लातूरमधून सलग दुसऱ्यांदा जनतेची जबाबदारी ते पुणे इतिहास घडविण्यात आपल्या सर्वांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे अशा स्थितीत आजच्या दिवशी माझ्यासाठी आपल्याला नमन करण्याची भारत आणि भारतीय लोकशाहीवरील आपल्या नेत्याला प्रणाम करण्याची संधी आहे असे या पत्रात नमूद केले आहे.या एक वर्षाच्या कार्यकाळात सर्जिकल स्ट्राइक स्ट्राइक वन रँक वन पेंशन अंमलबजावणी एक देश एक कर जीएसटी लागू करणे आणि शेतकऱ्याची किमान आधारभूत किमती विषयीचे वर्षानुवर्षे जुनी मागणी पूर्ण करण्याचे काम सरकारने केले असेही या पत्रात नमूद केले.
या पत्रात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या नात्याने भारताची राष्ट्रीय एकता लोकशाही समतामूलक समाज सर्वधर्म समभावाने मूल्यावर आधारित राजकारण यावर निष्ठा ठेवून वाटचाल करीत देशातील स्थानिक उत्पन्न उत्पादनाच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित भावनेने काम करीन शक्य तितकी खरेदी स्थानिक उत्पादनाची कोणाच्या साधीशी लढण्यासाठी सामाजिक जागरुकता आणि आरोग्य आणि स्वच्छतेच्या अभियान सुरु ठेवीन आता या पत्रात संकल्प माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार आत्मनिर्भर भारताचे ध्येय गाठण्यासाठी केला आहे.यावेळी बबनराव झांबरे,ॲड.वाल्मीकतात्या निकाळजे,ॲड.साहेबराव म्हस्के, लालाभाऊ कुमकर,आदिनाथ सानप,अजय धोंडे ,तालुकाध्यक्ष ॲड.हनुमंत थोरवे,अशोक साळवे ,अरुणभैय्या निकाळजे ,बाजीराव वाल्हेकर, शंकर देशमुख ,आण्णासाहेब लांबडे ,बाबु कदम, दिलीप काळे,बापुराव गर्जे , आदि पदाधिकारी उपस्थित होते.








