कायम राष्ट्रवादीवर निष्ठा असलेल्या अॅड.सुभाष राऊत यांना विधान परिषदेवर घ्यावे -अजय कोकाटे

कायम राष्ट्रवादीवर निष्ठा असलेल्या अॅड.सुभाष राऊत यांना विधान परिषदेवर घ्यावे -अजय कोकाटे
धारूर प्रतिनिधी
सत्ता असो किंवा नसो कायम राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्रजी पवार आणि समता परिषदेचे संस्थापक तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. छगनरावजी भुजबळ यांच्यावर कायम निष्ठा ठेवून 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करणारे समता परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष अॅड. सुभाष राऊत यांना विधान परिषदेवर घेऊन निष्ठावंत कार्यकर्त्यास न्याय द्यावा अशी मागणी तालुकाध्यक्ष समता परिषद विद्यार्थी आघाडी धारूर अजय कोकाटे यांनी केली आहे.
याबाबत राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे साहेब यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, अॅड. सुभाष राऊत हे समता परिषदेचे जिल्हाप्रमुख, औरंगाबाद विभागीय अध्यक्ष, सिनेट सदस्य, बीड नगर परिषदेचे नगरसेवक अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पडलेल्या सामाजिक शैक्षणिक संस्कृतीक पत्रातही त्यांचे काम नेत्रदीपक आहे. ना. भुजबळ साहेबाचे विश्वासू व निष्ठावंत असून त्यांना अनेक वेळा विधानसभा निवडणुकीत डावलून सुद्धा त्यांनी ना.भुजबळ साहेब व राष्ट्रवादीवर कायम निष्ठा ठेवत आजही पक्ष कार्यासाठी तळमळीने स्वतःला वाहून घेतले आहे.
महाराष्ट्रात माळी समाज लोकसंख्येच्या तुलनेत महाराष्ट्रात नंबर २ वर असून मराठवाड्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाविकासआघाडी मध्ये बोटावर मोजता येईल एवढ्याच माळी समाजातील विधानसभा निवडणुकीत तिकीट दिले गेले. तरी पण माळी समाज कायम ७० ते ८० टक्के महाविकास आघाडी सोबत आहे.
दि.१५ /६ /२०२० रोजी विधानपरिषदेच्या १५ जागा रिक्त होत असून शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री मा.श्री.उध्दवजी ठाकरे साहेब, व ना. छगन भुजबळ साहेब यांना सर्व माळी समाज व अॅड. सुभाष किसन राऊत साहेब समर्थक याची एकच नम्रपणे विनंती आहे की, समता परिषद जिल्हाअध्यक्ष तथा मराठवाडा विभागीय अध्यक्ष अॅड. सुभाष राऊत साहेब यांना विधान परिषद उमेदवारी देण्यात यावी अशी बीड जिल्ह्यातील माळी समाज व समता सैनिक, माळी महासंघ समर्थक यांची कळकळीची नम्र विनंती आहे.
अशी मागणी सामाजिक कार्यक्रर्ते व पञकार अजय कोकाटे यांनी केली आहे.








