आष्टी शहर विकास आराखड्याविषयी काही हरकती असल्यास न.पं.कडे लेखी स्वरुपात सादर कराव्यात-नगराध्यक्ष संगीता विटकर

Ashti

आष्टी शहर विकास आराखड्याविषयी काही हरकती असल्यास न.पं.कडे लेखी स्वरुपात सादर कराव्यात-नगराध्यक्ष संगीता विटकर

आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज

आष्टी शहर विकासाचा आराखडा (डी.पी. प्लॅन) तयार झाला असून प्रसिद्ध झालेल्या प्रारूप आराखड्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असल्यास नागरिकांनी मंगळवार दि. २३ जून रोजी पर्यंत हरकती लेखी स्वरूपात दाखल कराव्यात असे आवाहन नगराध्यक्षा श्रीमती संगीता विटकर यांनी केले आहे.
याविषयी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, आष्टी शहर विकासाचा आराखडा (डी.पी. प्लॅन) प्रसिद्ध झाला असून त्यामधील रस्ते रुंदी, मोकळ्या जागा, धार्मिक स्थळे तसेच यामध्ये दिसणारे विविध प्रयोजनासाठीचे आरक्षण या सर्व बाबींविषयी नगरपंचायत प्रशासनाकडून एकही चूक झालेली नाही परंतु नजरचुकीने एखादी त्रुटी राहिली असल्यास जाणकार सुज्ञ आणि सजग नागरिकांनी या त्रुटी विषयी तीन दिवसात मंगळवार दि.२३ जून पर्यंत रोजी लेखी स्वरूपात हरकती दाखल कराव्यात. त्यावर संबंधित तक्रारी हरकतीची दखल घेतली जाईल आणि आवश्यक वाटल्यास बदल ही केला जाईल.
दफनभूमी, शाळेची जागा, शासकीय जागा या सर्वांचा सर्वेनंबर एक असल्यामुळे काही विघ्नसंतोषी लोक या विकास आराखड्याबाबत जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत.
त्यामुळे जनतेतील सुजाण नागरिकांनी संभाव्य आष्टी शहराचा चेहरामोहरा बदलणारा हा विकास आराखडा असून आष्टी शहराच्या पुढील ५० वर्षाचा विकास कामे गृहीत धरून रस्ते, क्रीडांगण,बालोउद्यान,शॉपिंग कॉम्प्लेक्स ही कामे करण्यात येणार आहेत.
त्यामुळे आष्टीतील सुजाण नागरिकांनी,व्यापारी बंधू यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन ही शेवटी नगराध्यक्षा संगीता विटकर यांनी केले.

Sharing

Visitor Counter