अट्टल महाविद्यालयाचा फेसबुक लाईव्ह योगा दिन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद रासेयो विभाग आणि अट्टल महाविद्यालयाचा संयुक्त उपक्रम

Georai

अट्टल महाविद्यालयाचा फेसबुक लाईव्ह योगा दिन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद रासेयो विभाग आणि अट्टल महाविद्यालयाचा संयुक्त उपक्रम

गेवराई/प्रतिनिधी

२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त र.भ.अट्टल कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय गेवराई जिल्हा बीड येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि क्रीडा विभाग यांच्या वतीने 'फेसबुक लाईव्ह योगा' दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत एकत्र जमून योगा न करता प्राचार्य डॉ. रजनी शिखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पतंजली योग समितीचे क्रीडाशिक्षक तथा योग गुरु प्रा. राजेंद्र बरकसे हे लाईव्ह योगा सादर करणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. टी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून विद्यापीठ स्तरावरील सर्व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी व स्वयंसेवक या योगा डे मध्ये सहभाग नोंदवणार आहे. तरी र. भ. अट्टल महाविद्यालयाच्या फेसबुक पेजवरून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सकाळी २१ जून रोजी लाईव्ह होणाऱ्या या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रीय सेवा योजना बीड जिल्हा समन्वयक डॉ. सोपान सुरवसे, उपप्राचार्य मेजर विजय सांगळे, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. सचिन पगारे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. समाधान इंगळे, प्रा. रेवणनाथ काळे, डॉ.सुदर्शना बढे यांनी केले आहे.या उपक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांचे सहकार्य लाभणार आहे.
आंतरराष्ट्रीय फेसबुक पेज लाईव्ह योग दिनामध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर स्पर्श करा आणि महाविद्यालयाचे फेसबुक पेज लाईक करा.

Sharing