नवोदय विद्यालयास निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा धारूर मध्ये सत्कार

Beed

नवोदय विद्यालयास निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा धारूर मध्ये सत्कार

धारूर/इरफान शेख

धारूर शहरा मध्ये आज नवोदय विद्यालय गढी याठिकाणी निवड झालेल्या तीन विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षक यांचा सत्कार रुक्मिणी सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला

जानेवारी महिन्यात नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती त्यात धारूर येथील कु श्रावणी कसपटे, चि अर्थाव शिंदे, चि राहुल वाघमोडे यांची पुढील शिक्षण साठी निवड झाली आहे त्यांना येथील नाथा ढगे सर यांनी मार्गदर्शन केले यशस्वी विद्यार्थ्या व मार्गदर्शक शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला आतापर्यंत धारूर शहराचे आतापर्यंत 72 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे

सी बी एस सी पट्रन चे बारावी पर्यंतचे शिक्षण अगदी मोफत या विद्यार्थ्यांना मिळणार आहे कठीण असणाऱ्या या परीक्षेत यश मिळवल्या बद्दल मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थी यांचे मराठी पत्रकार परिषदेचे सचिव अनिल महाजन, राजमुद्रा संघटनेचे मार्गदर्शक सुरेश शेळके, संतोष कसपटे, रमाकांत शिंदे, वैजनाथ वाघमोडे इत्यादींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत

Sharing

Visitor Counter