वाळूजमहानगरातील सतीश पाटील जनसेवेतून शोधताय मानव धर्म!

वाळूजमहानगरातील सतीश पाटील जनसेवेतून शोधताय मानव धर्म!
वाळूजमहानगर/ प्रतिनिधी
देशात सदया कोरोना संसर्गजन्य आजाराने थैमान मांङले असताना वाळूज औद्योगिक वसाहतीत सामाजिक कार्यकर्ते तथा पंचायत समिती सदस्य सतीश राजाराम पाटील , माया सतीश पाटील या दाम्पत्यांनी वाळूजमहानगरातील वङगांव, बजाजनगर, तिसगांव,पंढरपूर ,वळदगांव, राजणगांव आदी भागातील गरजू, बेकार , मजूर निराधारांना लाँकङाऊनच्या पहिल्या सञात स्वतःचे सहा महिन्याचे मानधन देऊन जनसेवा करण्याची सुरूवात केली.पुढे लाँकङाऊन असताना अन्न धान्ये वाटप, रक्तदान शिबीर, औद्योगिक वसाहतीतील नागरिकांना जिल्ह्याच्या बाहेर जा - ये करण्यासाठी शासकीय पासेस, याकाळात निर्माण झालेल्या अत्यआवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, औषध वाटप,
अशा विविध जनसेवेच्या माध्यमातून वाळूज औद्योगिक वसाहतीत अविरत सेवा कार्य करीत आहेत . स्वतः शेतकरी कुटूंबातील असल्याने आणि गरीबीची जाणिव असल्यामुळे सतिश पाटील यांच्या पत्नी माया सतिश पाटील या देखील सेवा कार्यात तत्त्पर आहेत .या जनसेवेच्या कार्यात सामाजिक कार्यकर्ते ,पोलिस ,पञकार, माजी व आजी राजकीय मंङळी, उदयोजक, शिक्षक ,वैद्यकिय अधिकारी , विद्यार्थी - विद्यार्थ्यांनी, कामगार , आदीचा या कोरोना संसर्गजन्य आजारपणात जनसेवा कार्यात मोलाचा वाटा आहे .








