उपजिल्हा रुग्नालय, गेवराईचे वैद्यकिय अधिकारी डॉ.एकनाथ ढगे यांचे निधन!
उपजिल्हा रुग्नालय, गेवराईचे वैद्यकिय अधिकारी डॉ.एकनाथ ढगे यांचे निधन!
गेवराई/प्रतिनिधी
सुस्वभावी-अतिशय उमद्या मनाचे व्यक्तिमत्व म्हणून गेवराईत प्रसिद्ध असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ ढगे यांचे आज दि. २३ रोजी निधन झाले.
गेवराई येथे शिवजयंती उत्सव समितीतर्फे आयोजित महाआरोग्य शिबीरात त्यांनी मोलाचे सहकार्य केले होते. अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून ते गेवराई उपजिल्हा रुग्णालयात सेवेत होते. तथा माऊली हॉस्पिटल बीड येथे डॉक्टर सदाशिव राऊत सर यांच्यासोबत चांगल्या प्रकारे गोरगरिबांची मदत करणारे अत्यंत कमी वयातच काळाने त्यांच्यावर घाला घातला.३ दिवसा पूर्वी बीड येथे इमारतीवरून खाली पडल्यामुळे त्यांचा अंत झाला असल्याचे समजते.त्यांच्या मृत्यूची बातमी गेवराई शहरात कळताच सर्वत्र शोककळा पसरली. अनेकांना त्यांच्या निधनाचे वृत्त खरे वाटले नाही. तरूण व होतकरू डॉक्टर ढगे यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.