जीवन शिक्षण माध्यमिक विद्यालयात पुस्तक वाटप!

जीवन शिक्षण माध्यमिक विद्यालयात पुस्तक वाटप!
धारूर/इरफान शेख
धारूर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या गांजपूर येथील जीवन शिक्षण माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले ऑनलाईन शिक्षणा बरोबरच पुस्तक वाचन देखील विद्यार्थ्यांचे व्हायला हवे
शासनाच्या वतीने दिले जाणारे तसेच ९ वी व १० वी च्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांना ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने पुस्तके देण्यात आले उर्वरित विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी शिक्षकानी बांधावर जावून पुस्तके वाटप केली नवीन पुस्तके मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चहऱ्यावर आनंदी वातावरण निर्माण झाले आहे कौतूहलाने विद्यार्थी पुस्तक वाचन करत आहेत
यावेळी मुख्याध्यापक विजयकुमार मुंडे, उपमुख्याध्यापक आरून समुद्रे, सहशिक्षक महादेव केदार , नाथा ढगे, प्रमोद कोमटवार , नितीन सुतार व इतर कर्मचारी उपस्थित होते








