गेवराईत राष्ट्रवादीकडून गोपीचंद पडळकरचा जाहीर निषेध

Georai

गेवराईत राष्ट्रवादीकडून गोपीचंद पडळकरचा जाहीर निषेध

गेवराई/प्रतिनिधी

बीड. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार साहेब यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या गोपीचंद पडळकर याचा गेवराई राष्ट्रवादी युवक च्या वतीने गोपीचंद पडळकर च्या प्रतिमेला जोडे मारून जाहीर निषेध करण्यात आला.

गोपीचंद पडळकर यांने नुकतेच एका ठिकाणी जेष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार साहेब यांच्याबद्दल अपशब्द वापरले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात संताप व्यक्त केला जात असून गेवराई येथील राष्ट्रवादी युवक च्या वतीने गोपीचंद पडळकर च्या प्रतिमेला जोडे मारून जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार, उपाध्यक्ष दत्ता दाभाडे, दत्ता पिसाळ, जयसिंग माने, वसीम फारोकी, संदिप मडके, आदित्य दाभाडे, ऋषिकेश मोटे, आनंद दाभाडे, रमेश जामकर, गोकुळ चोरमले, अमित वैद्य, ऋषिकेश सिरसट, शेख मुनिर, शेख अमीर, अली खान, शेख अरबाज, शेख शाहरुख, शेख अमजद आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Sharing