धारूर शहरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये घाणीचे साम्राज्य!

Dharur

धारूर शहरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये घाणीचे साम्राज्य!

धारूर/प्रतिनिधी

सद्या स्थितीत कोरोना सारख्या महाभयंकर महामारीने संपूर्ण देशभरात थैमान घातले असून अश्या परस्थितीत देखील किल्ले धारूर नगर परिषद प्रभाग क्रमांक ३ या भागाकडे हक्काने दुर्लक्ष करीत आहे.या प्रभागात असलेले नाल्यावरील ढापे संपूर्णपणे कमकुवत अवस्थेतअसून
ते तुटण्याच्या मार्गावर आहेत.या भागात मूलभूत सुविधा उपलब्ध व्हावे म्हणून येथील नागरीकांनी लेखी स्वरूपात गेल्या अनेक वर्षांपासून तक्रारीअर्ज केल्या आहेत.उपोषणे केले आहेत. तरीही या भागात रस्ते नाल्या पाणीची कमतरता व अन्य प्रश्न मार्गी लावण्यास नगर परिषद कार्यालय अप्यशी ठरली आहे.सध्या पावसाळा सुरू झाला असून या भागात रस्ते नाल्या बरोबर नसल्याने घरात पावसाचे पाणी शिरत असते माझ्या सहित भागातील नागरिकांची एकच अपेक्षा असून संबंधित मुख्याधिकाऱ्याने या भागाची पाहणी करून त्वरित रस्ते नाल्या व पसरलेली दुर्गंधी जेणे मोठ मोठे आजार पसरल्या शिवाय राहणार नाहीत याची दखल घेऊन सदरील भागाची होत असलेली गैर सोय थांबवावी अशी मागणी अतीक इस्माईल मोमीन जिल्हा अध्यक्ष विश्व मानव अधिकार परिषद शाखा बीड जिल्हा व समस्त नागरिक प्रभाग क्रमांक ३ यांनी या प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.

Sharing

Visitor Counter