बीड जिल्ह्यातील ईतिहासिक स्थळे कचराग्रस्त !

Beed

बीड जिल्ह्यातील ईतिहासिक स्थळे कचराग्रस्त !

बीड/प्रतिनिधी

बीड मधील सर्व ईतिहासीक स्थळे हे कचरा ग्रस्त झालेली आहे, तरी याकडे नगरपालिकेचा साफ दुर्लक्ष होत आहे .सध्या परिस्थितीला कोरोना सारख्या रोगापासून पुर्ण राज्य आणि देश लढण्यासाठी तयारी करत आहे या मध्ये विशेष करून साफ सफाईचे धडे लोकांना देण्यात येत आहे परंतु बीड शहरात या सर्व बाबींच्या उलटच घाणीचे साम्राज्य दिसुन येत आहे विशेषतः बीड शहरातील शोभा व वारसा असणारे ऐतिहासिक स्थळे हे घाणीने व्यापलेली आहे आणि या बाबतीत बीड नगर पालिका आपल्या कर्तव्यास बिलकुल ही गंभीर दिसत नाही.

कचर्याने व्यापलेली हि सर्व ऐतिहासिक स्थळे बीड शहराची शान आहे व सर्व स्थळे बीड शहराच्या मध्यभागी नागरी वसाहतीत असुन येथे मोठ्याप्रमानात लोकांची ये-जा होत असते यामुळे रोगराई पसरण्याचे हे मुख्य स्थान ठरू शकतात याबाबतीत बीड नगर पालिकेने लवकरात लवकर लक्ष घालून बंदोबस्त करावे अशी मागणी शहरवासीयांकडुन होत आहे.

Sharing

Visitor Counter