भाज्यांची अडत मार्केटच बंद का ? भाजीपाल्याची चढ्या भावाने विक्री !

Beed

भाज्यांची अडत मार्केटच बंद का ? भाजीपाल्याची चढ्या भावाने विक्री !

बीड/प्रतिनिधी

बीड शहरातील भाजीपाला अडत बाजार बंद असल्यामुळे तसेच विविध भागात भाजी विकण्यास मज्जाव केल्याने भाज्यांचे भाव कडाडले आहेत.

प्रशासनाने अडत बाजार बंद केल्याने बीड शहरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे व शासनाने फेरविचार करून भाजीपाला होलसेल मार्केट बीड शहराबाहेर किंवा शहरातील मल्टीपरपज ग्राउंड ,चंपावती ग्राउंड ,मार्केट नदीपात्रातील मोकळी जागा या ठिकाणी भाजीपाला विक्री करण्यासाठी परवानगी देऊन प्रशासनाने बीड शहरातील नागरिकांची चढ्या भावाने विक्रीचा प्रश्‍न मार्गी लावा.

अडत बाजार बंद असल्याने मागील काही दिवसापासून व्यापारी चांदणी चौक , बिंदुसरा पात्र, जिल्हा परिषदेच्या रोड वर तसेच अन्य ठिकाणी सोशलडिस्टनस ठेवून आपल्या वाहनातून भाजी विकत होते.

भाजीपाला जीवनावश्यक आहे कुर्ला रोड वरील मोंढा बाजार चालू आहे तिथेही गर्दी होते मग भाजीपाला बाजारच बंद का केला जातो असा सवाल व्यापारी करत आहे शहरातील नागरिकांना भाजीपाला सुरळीत उपलब्ध होण्याच्या दृष्टीने भाजीपाला बाजार सुरु करण्यास परवानगी देण्याची मागणी आहे बाजार सुरू करायचा नसेल तर प्रशासनाने पहाटे चार ते सात या वेळेत भाजी विकण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी एकापेक्षा जास्त जागा उपलब्ध केल्यास गर्दी टाळता येईल.

"प्रशासनाने फेर विचार करून निर्णय घ्यावा"
भाजीपाला बाजार व व्यापारी दिवानजी हमाल आदीसह किरकोळ विक्रेते अशा शेकडो लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.

Sharing

Visitor Counter