केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल, डिझेल व गॅसचे दरवाढ!

केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल, डिझेल व गॅसचे दरवाढ!
गेवराई/प्रतिनिधी
केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल, डिझेल व गॅसचे दरवाढ करत असल्याने सर्व सामान्य माणसा सह सर्वांना आर्थिक भुर्धंड सोसावे लागत आहे म्हणून केंद्र सरकारला जागे करण्याचे काम काँग्रेस करत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
गेवराई तहसिल कार्यालयात सोमवार रोजी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार बीड जिल्हा काँग्रेस नेत्या माझी खासदार रजनीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजकीशोरजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ विरोधात निवेदनं देण्यात आले. निवेदनात केंद्र सरकार सातत्याने पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ करत असल्याने वाहतूक खर्च, वाहन खर्च व घरगुती खर्च वाढत आहे परिणामी महागाई वाढत असल्याने नागरिकांचे कंबरडे मोडले गेल्याने सर्व नागरिकांची अर्थव्यवस्था विस्कटून पडली आहे अश्या वेळी आशेचा एक किरण म्हणुन काँग्रेस कडे लोक पाहु लागले आहे.
गेवराई तहसिल परिसरा बाहेर प्रथम पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ विरोधात घोषणाबाजी करुन केंद्र सरकार विरोधात बोंबा मारण्यात आल्याने परिसर दुमदुमले होते. तयानंतर तहसिल कार्यालयात उपस्थित नायब तहसीलदार खेडकर यांना काँग्रेस शहराध्यक्ष सय्यद सिराज अहमद सय्यद हाजी, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षपद अँड गणेश कोल्हे, किसान सेलचे अंकुशदादा पाचपुते यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. या वेळी काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते रामरावजी रुचकर, शेख अहमदभाई, शिवकुमार शर्मा, दत्ता राठोड, नानासाहेब चोरमले,अंकुश टेकाळे, मोहन जोशी सह आदि जन उपस्थित होते. काँग्रेस पक्षाने नागरिकांच्या हितासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याने नागरिकांना मधुन समाधान व्यक्त होत आहे.








