किल्ले धारूर शहरातील 10 वर्षे मुलाला कोरोनाची लागण
किल्ले धारूर शहरातील 10 वर्षे मुलाला कोरोनाची लागण
धारूर/प्रतिनिधी
परळी पाठोपाठ अंबेजोगाई सह किल्ले धारूर शहरात सुद्धा मुंबईहून परतलेला अशोक नगर भागातील दहा वर्षीय मुलला कोरनाची लागण झाल्याचे आज निष्पन्न झाले
किल्ले धारूर शहरात अशोक नगर भागांमध्ये काही दिवसाखाली मुंबईहून वाशी भागातून एक कुटुंब आठ दिवसापूर्वी शहरात आले होते अशोक नगर भागांमध्ये त्याचे आजी-आजोबा राहत होते या मुलाचा स्वॅप तपासणीसाठी घेण्यात आला होता त्या सोबत त्याच्या आई-वडिलांचेही स्वॅप घेण्यात आले होते मुलाचा स्वॅप पॉझिटिव्ह आला असून त्याच्या आई-वडिलांची स्वॅप अनिर्णित आले आहेत तरी त्याच्या आई-वडिलांच्या स्वॅप डबल घेण्यात येणार आहेत अशी माहिती आरोग्य अधिकारी चेतन आदमाने यांनी दिली
किल्ले धारूर वासीयांना नगरपरिषद च्या वतीने स्वतःची काळजी तसेच सोसिल डिस्टन्स ठेवण्याचे आव्हान करण्यात आले आहे