किल्ले धारूर नगर परिषद कार्यालय नवीन इमारत येथे सोलार उर्जा प्रकल्पा चे उद्घाटन

किल्ले धारूर नगर परिषद कार्यालय नवीन इमारत येथे सोलार उर्जा प्रकल्पा चे उद्घाटन
किल्लेधारूर/इरफान शेख
किल्ले धारूर नगर परिषद कार्यालय (नवीन इमारत) येथे आज दिनांक ६/७/२०२० रोजी सोलार उर्जा प्रकल्पा चे उद्घाटन भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी यांचे शुभ हस्ते झाले. सदरील योजना केंद्र सरकार मार्फत मेडा (MEDA) अंतर्गत २०१८ साली योजना मंजुर झाली, सदरील काम पर्ल एनर्जी सोल्युशन लातुर मार्फत होत आहे , या मध्ये ३० पॅनल असून त्यामुळे १० कि. वॅट विज तयार होणार असून ५ वर्ष देखभाल व दुरुस्तीचे काम पर्ल एनर्जी सोल्यूशन मार्फत होणार असून या मूळे इमारतीच्या विजबिलात मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे अशी माहीती नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी यांनी दिली.
यावेळी मुख्याधिकारी नितीनजी बागुल, बाळासाहेब गायकवाड, गटनेते रोहीत हजारी, नगरसेवक शेख एजाज, चोखाराम गायसमुद्रे, सुरेश लोकरे, बाळासाहेब खामकर, कार्यालयीन अधिक्षक नितीन इजाते, अरुण वाघमारे, श्रीकांत वडगावकर, फून्ने मॅडम, सचिन डावकर, माणीक गायसमुद्रे, गोविंद मुंडे, विष्णू कराड, किरन नेहरकर, जायभये मॅडम, संदिप नलावडे,माणीक लोखंडे, विजय शिनगारे, बालासाहेब शिनगारे उपस्थित होते.








