बीड जिल्ह्यासाठी पीक विमा कंपनीची नियुक्ती बकरण्याची मागणी
Georai
बीड जिल्ह्यासाठी पीक विमा कंपनीची नियुक्ती बकरण्याची मागणी
गेवराई/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यासाठी पीक विमा कंपनीची नियुक्ती बकरण्याची मागणी गेवराई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस, युवक काँग्रेस च्या वतीने करण्यात आली. बीड जिल्ह्यामध्ये खरीप व रब्बी हंगामातील पिकासाठी एकही विमा कंपनी जिल्ह्यात येत नसल्याने जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन जिल्ह्यासाठी पीक विमा कंपनीची नियुक्ती करण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार,गेवराई यांना देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दत्ता दाभाडे, रवी कानडे, सुभाष गुंजाळ, जयसिंग माने, शेख मोहसिन, बाळासाहेब चाळक, शेख मोबिन आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.