अशोक नगर मध्ये सुरक्षा समिती व प्रशासना कडून नागरीकाना मदत जिवनावश्यक वस्तूचे वितरण व होमीओपॕथीक गोळ्याचे वाटप

अशोक नगर मध्ये सुरक्षा समिती व प्रशासना कडून नागरीकाना मदत जिवनावश्यक वस्तूचे वितरण व होमीओपॕथीक गोळ्याचे वाटप
धारूर/इरफान शेख
शहरातील आशोकनगर भागात शहरातील दुसरा कोरोना रुग्न सापडल्या वर शहरात प्रशासना कडून दक्षता घेतली जात असून या भागात संचारबंदी लागू करण्यात आली असून सुरक्षा समितीचे वतीने प्रभागात घरोघर जाऊन जनजागृती करून गरजू कुंटूंबाना मदत हि करण्यात आली .
शहरातील अशोकनगर भागात मुंबई हुन आलेला एक दहा वर्षीय मुलगा कोरोना पाॕजीटीव्ह आल्या वर या भागात संचारबंदी लागू करण्यात आली असून नगरपालीका प्रशासनाने याभागातील सर्व प्रवेश बंद केले असून नगराध्यक्ष डाॕ स्वरूपसिंह हजारी मुख्याधीकारी नितिन बागूल वैद्यकीय अधिक्षक
डाॕ चेतन आदमाने तालूका आरोग्य अधिकारी
डाॕ सचिन शेकडे सहायक पोलीस निरीक्षक सुरेखा धस नगरपालीका अधिक्षक नितिन इजाते बालाजी चव्हाण बाळासाहेब गायकवाड यांनी या भागात भेट देऊन सर्व नागरीकास प्रशासनाचे नियमाचे पालन करून दक्षता बाळगण्याचे अवाहण केले.
या भागात आरोग्य विभागा मार्फत कुंटूंब तपासणी करण्यात आली असून प्रभाग सुरक्षा समितीचे वतीने कोराणा झालेल्या बालकाचे कुंटूंबास जिवनावश्यक वस्तूचे किट देऊन या प्रभागात प्रत्येक कुंटूंबा स भेट देऊन प्रतीकार शक्ती वाढवणा-या होमीओपॕथीक आॕरसेनीक या गोळ्याचे वितरण करून जनजागृती करण्यात आली या वेळी समिती प्रमूख बालाजी चव्हाण , समितीचे सदस्य पञकार अनिल महाजन अतूल शिनगारे आनंद कंकाळ बंडू सांवत पो काॕ अघाव हे उपस्थीत होते.








