लाॕकडाऊन काळातील २६ गाळेमालकांचे दोन महिन्यांचे महेश हंबर्डे यांनी केले तीन लाख रुपये भाडे माफ

लाॕकडाऊन काळातील २६ गाळेमालकांचे दोन महिन्यांचे महेश हंबर्डे यांनी केले तीन लाख रुपये भाडे माफ
आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज
आष्टी शहरातील अनेक छोट्यामोठ्या व्यावसायिकांनी भाडेतत्त्वावर जागा घेऊन विविध व्यवसाय सुरू केले आहेत. देशांमध्ये कोरोना महामारी आल्याने संपूर्ण देशामध्ये २१ मार्चपासून एप्रिल २०२० - आणि मे २०२० संपूर्णपणे लॉकडाऊनमध्ये जवळपास तीन महिने संपूर्णपणे छोटेमोठे व्यवसाय बंद होते.या काळामध्ये व्यवसाय गाळामालकांकडुन गाळेभाडे घेऊ नये असे आवाहन आ. सुरेश धस यांनी लाॕकडाऊनच्या काळामध्ये केल्याने या आवाहनास आष्टीतील कार्यकर्ते महेश हंबर्डे यांनी प्रतिसाद दिला.महेश हंबर्डे यांनी स्वताःचे मालकीचे २६ गाळाधारक भाडेकरूंना दोन महिन्यांचे तब्बल तीन लाख रुपये भाडे माफ केले आहे. या त्यांच्या निर्णयाबद्दल गाळेधारकांनी अभिनंंदन करुन सत्कार केला.आ.सुरेश धस यांच्या हस्ते महेश हंबर्डे यांचा सत्कार करण्यात आला.विशेष म्हणजे आ.सुरेश धस यांच्या आवाहनाला महेश हंबर्डे यांनी प्रतिसाद दिल्याने स्वतः आ.सुरेश धस आणि आष्टीतील सर्व पत्रकारांचे उपस्थितीत महेश हंबर्डे यांचा सत्कार केला.यावेळी महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, पत्रकार उत्तम बोडखे,पञकार गणेश दळवी ,पत्रकार दादासाहेब बन,पत्रकार शरद शरद रेडेकर,भीमराव गुरव,सचिन रानडे, प्रवीण पोकळे ,नगराध्यक्ष भारत मुरकुटे,व्यापारी संघटनेचे तालुका अध्यक्ष संपत शेळके ,संजय पवार आदि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.महेश हंबर्डे यांनी सुरेश धस यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याने तीन लक्ष रुपये गाळेभाडे माफ केल्याने यांचे स्वागत होत आहे.








