राजगृहावर केलेल्या भ्याड हल्लाच्या निषेधार्थ धारुर तहसील कार्यालयात भारिप बहुजन महासंघच्या वतीने दिले निवेदन

Beed

राजगृहावर केलेल्या भ्याड हल्लाच्या निषेधार्थ धारुर तहसील कार्यालयात भारिप बहुजन महासंघच्या वतीने दिले निवेदन

किल्लेधारुर/प्रतिनिधी

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक वास्तू असलेल्या राजगृहावरील हल्लेखोरांना तात्काळ अटक करा.
काल अज्ञात हल्लेखोरांनी जगातील आंबेडकरी जनतेची अस्मिता असलेल्या राजगृहावर हल्ला केला. राजगृहावरील हल्ल्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे.
राजगृह हे बौद्धांचं प्रतीक आहे, आमचं काळीज आहे. हल्लेखोर हे मनुवादी आतंकी प्रवृत्तीचेच असल्याचा आमचा ठाम विश्वास आहे. राजगृहामध्ये राहत असलेल्या परिवाराला सुद्धा हा टार्गेट करण्याचा कुठली डाव आहे, दहशत निर्माण करून तुम्ही घरातच बसा हा इशारा यातून दिसतोय.
राज्य सरकारने या घटनेला गांभीर्याने घेऊन तात्काळ सखोल चौकशी करत या घटनेमागिल मनुवादी प्रवृत्तीच्या मुसक्या आवळाव्यात.
भारीप भहुजन माहासंघ मागणी करते की, राजगृहाला कायमस्वरूपी संरक्षण देण्यात यावे, देशभरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक आंबेडकर भवन सहित सर्व वास्तूला संरक्षण देण्यात यावे, आंबेडकर परिवाराला तात्काळ संरक्षण देण्यात यावे, मनुवादी हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्यात यावी.
हल्लेखोरांना तात्काळ अटक न केल्यास भारीप भहुजन माहासंघ कोरोना तोडून आंदोलन छेडेस असा इशारा देत आहे.भारिप बहुजन महासंघाचे धारुर तालुका उपाअध्यक्ष अकाश गोरखनाथ गायसमुद्रे,विश्वास सखाराम वाव्हळ,अजय प्रकाश गायसमुद्रे,
अनिकेत अशोक गायसमुद्रे, सहसचिव
संदीप संतराम गायसमुद्रे ई.निवेदन देतांना उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter