राजगृह येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेर्धात व राज्यातील बौध्द व दलित यांच्यावर वाढत्या अत्याचारा विरोधात आर. पी. आय ए.च्या वतीने आष्टी तहसीलवर निषेध आंदोलन संपन्न

राजगृह येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेर्धात व राज्यातील बौध्द व दलित यांच्यावर वाढत्या अत्याचारा विरोधात आर. पी. आय ए.च्या वतीने आष्टी तहसीलवर निषेध आंदोलन संपन्न
आष्टी /प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज
राज्याची व देशाची अस्मिता असलेले विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवास स्थान असणाऱ्या राजगृहात येथे दिनांक ७ जुलै रोजी संध्याकाळी काही अज्ञात समाजकंटकांनी घुसून तोड फोड केली असून हा हल्ला तमाम बहुजनांच्या अस्मीतेवर केलेला भ्याड हल्ला आहे. या घटनेच्या निषेर्धात व महावीकास आघाडीच्या सरकारच्या काळात दलित व बौध्दावर होत आसलेल्या हल्ल्याच्या विरोधात आष्टी तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए. च्या वतीने आष्टी तहसील वर निषेध आंदोलन करण्यात आले. दलित व बौध्दाना संरक्षण देण्याची मागणी आर.पी.आय चे तालुका उपाध्यक्ष व तालुका अध्यक्ष अशोक साळवे यांनी आष्टीचे तहसीलदार वैभव महिंद्रकर यांना निवेदनाद्वारे केली आहे.
खा.रामदास आठवले व पप्पू कागदे यांच्या आदेशावरुन राजग्रह येथील हल्ल्याच्या निषेर्धात व राज्यातील बौध्द व दलित यांच्यावर वाढत्या अत्याचारा विरोधात आर. पी. आय ए.च्या वतीने आष्टी तहसीलवर निषेध करण्यात आला. मुख्यमंत्री उध्वव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्रात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात तमाम बहुजनांच्या अस्मिता आसलेले श्रध्दास्थान महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आसलेल्या राजग्रह येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेर्धात व लॉक डाऊन च्या काळात महाराष्ट्रात आनेक ठिकाणी दलितांनवर हल्ले झाल्याचे, घरे जाळल्याचे, दलित बौध्द तरुणाचे हत्या झाल्याचे निषेधार्ह प्रकार घडले आहे. दलित आणि बौध्दावर वाढत आसलेले आत्याचार रोखण्याकडे राज्य सरकार अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. दलित आणि बौध्दावरील आत्याचार वाढत आसताना ते रोखन्यासाठी महाविकास आघाडी सरकार आपयशी ठरले आहे. राजग्रह येथील हल्ल्याच्या निषेर्धात दलित आणि बौध्द यांच्यावरील आत्याचाराच्या विरोधात आष्टी तहसीलवर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी अशोक साळवे, अरूण भैय्या निकाळजे, सादिक कुरेशी, शशिकांत निकाळजे अशोक निकाळजे, उपस्थित होते.








